lockdown loose in ratnagiri
 lockdown loose in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत शुक्रवारपासून बस, रिक्षा वाहतूक, सलूनसह या सेवा सुरु होणार पण या आहेत अटी...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी  : लॉकडाऊन नियमांमध्ये  २२ मे पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले . यात जिल्हांतर्गत बससेवा तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे.

या अटी खालीलप्रमाणे...

  •   या अंतर्गत दिलेल्या आदेशात क्रीडा संकुल व मैदाने तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा याठिकाणी सामाजिक अंतर ठेवून वैयक्तिक सरावास परवानगी असेल मात्र समूह आणि प्रेक्षक  जमा होतील असे क्रीडाप्रकार आयोजित करण्यास बंदी असेल.
  • तीन चाकी वाहन/ रिक्षा यामध्ये 1 वाहनचालक व 2 प्रवासी अशा मर्यादित सुरू करता येणार आहे. प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत जिल्हयात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी बस सेवा सुरु करात येईल.
  • सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5  या कालावधीत सुरू ठेवता येतील.  मात्र दुकानांच्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल तसेच  दुकानासमोर एकाच वेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत, असे बंधन राहणार आहे.
  • अत्यावश्यक सेवा व त्याव्यतिरिक्त इतर सेवा यांच्यासाठी  ई-कॉमर्सच्या माध्यमातून मान्यता असेल. कुरियर आणि पोस्टाच्या सेवा सुरू राहतील.
  • केशकर्तनालय, सलून स्पा आदि दुकाने समाजिक अंतर ठेवणे व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील.
  • अंत्यविधी व अंत्ययात्रेच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून 50 च्या मर्यादेत व्यक्तीना उपस्थित राहता येईल.सर्व शासकीय कार्यालय 100 टक्के  उपस्थितीत सुरळीत सुरु ठेवता येतील. या कार्यालयामध्ये मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह  सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल.
  •  महाराष्ट्र शासनाच्या 19 मे 2020 रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 मधील बदल करणारा हा आदेश शुक्रवार 22 मे पासून लागू असे असे आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT